Monday, December 28, 2009

गुटख्याने केली तरुणांची बोलती बंद

तरुणांमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण वाढत चालल्याने यापैकी अनेकांची बोलती बंद होण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळकरी मुलांमध्येही ही लागण वाढत चालली आहे.

नंदू या १४ वर्षाच्या मुलाला आता गुटखा खाल्ल्याशिवाय झोपच लागत नाही इतका तो व्यसानाधीन झाला आहे.

गुटख्यामुळे नंदूसारख्या अनेकांना तोंडाचा कर्करोग जडला आहे. टाटा कर्करोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या अशा तरुणांची संख्या वाढते आहे. तोंडाचा आणि घशाचा कर्करोग तरुणांमध्ये होण्याचे प्रमाण वाढते आहे. अशा एकंदर रुग्णांपैकी वीस टक्के हे तिशीच्या आतल्या वयोगटातले आहेत.

डॉक्टरांच्या मते, बहुतेकांना गुटख्याचे व्यसन शाळकरी आणि कॉलेजमध्ये जाण्याच्या वयात जडते. शिक्षणसंस्थांच्या आसपास असणाऱ्या दुकांनांमध्ये सहजतेने गुटखा मिळतो हे त्याचे एक प्रमुख कारण आहे.

अशाच एका नामवंत शाळेतील मुख्याध्यापकांच्या मते, हल्ली पालक, शिक्षकांशी संवाद राखत नाहीत. त्यामुळे आपल्या मुलाचे काय चालले आहे हे पालकांना कळत नाही. पूवीर् शिक्षक आपणहून, विद्यार्थ्याच्या आचारविचारातील बदल पालकांच्या कानावर घालायचे. हल्ली अनेक पालक पालक सभेलाही जेमतेम हजर राहतात. आपल्या मुलाला क्लासमध्ये घातले की झ्घले अशी त्यांची वृत्ती असते अशी खंत या मुख्याध्यापकांनी बोलून दाखवली.

पालक सहजतेने मुलांना देत असलेला पॉकेट मनी हेही आणखी कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हल्ली पालक आणि मुले यांच्यातही संवाद नसतो. आईवडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे आपले मुल नेमके काय करते याची त्यांना कल्पना नसते. पूवीर् पालक मुलाचे दप्तर तसेच खिसे त्याच्या नकळत तपासायचे. ही पद्धतही हल्ली अवलंबली जात नाही

1 comment: